हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय , बाकी काही नाही
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
" एका " सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव .. आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय , बाकी काही नाही
मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय , बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत , डोळे पुसत , पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला , सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
" कुणीतरी आठवण काढतंय ....
बाकी काही नाही
Monday, July 16
Saturday, June 9
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी मलाच हरवून बसलो
हात तुझा हातातून सुटताना
एक आधार गमावून बसलो
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तसं मी मनातही आणलं नव्हतं
वाटलं तू तरी ओळखशील मला
माझं दु:ख कोणीचं जाणलं नव्हतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुझा आरोप मला मान्य नाही
परीस्थितीने दगा दिला, नाहीतर
माझं प्रेम इतकं सामान्य नाही
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी इतका नाही गं अर्धवट
तुझं आयुष्य पुढे सुखी व्हावं
म्हणून केली ती सारी खटपट
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
एकनिष्ट मलाही रहायच होतं
पण नीयतीला कुठे आपल्याला
असं फुललेलं पहायच होतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुला दु:खां पासून दूर नेलेलं
पुढच्याच वळणावर
मी मलाच उद्धवस्त केलेलं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
परीस्थितीच अस्पृश्य होती
तुझ्या माझ्या मिलनाची
हातावरची रेषाच अदृश्य होती
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
नात्यात कधीच बहर नव्हता
एकमेकांसाठी तळमळण्याची
भावनेत कधीच कहर नव्हता
मी मलाच हरवून बसलो
हात तुझा हातातून सुटताना
एक आधार गमावून बसलो
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तसं मी मनातही आणलं नव्हतं
वाटलं तू तरी ओळखशील मला
माझं दु:ख कोणीचं जाणलं नव्हतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुझा आरोप मला मान्य नाही
परीस्थितीने दगा दिला, नाहीतर
माझं प्रेम इतकं सामान्य नाही
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी इतका नाही गं अर्धवट
तुझं आयुष्य पुढे सुखी व्हावं
म्हणून केली ती सारी खटपट
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
एकनिष्ट मलाही रहायच होतं
पण नीयतीला कुठे आपल्याला
असं फुललेलं पहायच होतं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुला दु:खां पासून दूर नेलेलं
पुढच्याच वळणावर
मी मलाच उद्धवस्त केलेलं
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
परीस्थितीच अस्पृश्य होती
तुझ्या माझ्या मिलनाची
हातावरची रेषाच अदृश्य होती
मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
नात्यात कधीच बहर नव्हता
एकमेकांसाठी तळमळण्याची
भावनेत कधीच कहर नव्हता
Monday, May 28
म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून !!
किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तोही गुलाब जाइल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
"थॅंक्स!" म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून
किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून
रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
किती दिवस थांबणार तू बोलल्या वाचुन
एक दिवस येशील एकटं तिला गाठुन
रडतच निघेल ती पत्रिका हातात देवुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
जाशील लग्नाला शेवटच बघायला म्हणुन
मारशील तू अक्षता नवऱ्याला फेकुन
बघशील तेंव्हाही तिला चोरुन चोरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
कधी तरी दिसशील तु तीला रस्त्या वरुन
थांबवेल तेंव्हा तुला ती एक हाक मारुन
विसरशील तू स्वःतालाच तिचं बाळ पाहुन
तीच म्हणेल तेंव्हा तुला
"एकदातरी...
बघायच होतस मला सांगून !!"
म्हणूनच म्हणतो,
वेळे आधीच गड्या दे लाज सोडुन
सांग तिच्या नजरेला नजर तू देवुन
हात तिचा तुझ्या हातात तू घेवुन
मांड तुझ्या भावना तिला तू कळवळून
बघेल जेंव्हा तुला ती डोळे भरुन
मिठी मारेल तुला तेव्हा ती कळकळून!
एकदातरी.....
बघ तिला सांगून !!

Monday, May 14
ती जेव्हा बोलते ना.......
ती जेव्हा बोलते ना मनातून
शब्द व्हावंसं वाटतं
ती जेव्हा चालते ना जनातून
स्तब्ध व्हावंसं वाटतं
ती हलते पानातून, मी वारा होतो
ती फुलते नभातून, मी तारा होतो
ती जेव्हा रुसते ना माझ्यावर,
ओंजळीच्या उशीत घ्यावसं वाटतं
ती जेव्हा रडते ना अनावर,
आई बनून कुशीत घ्यावसं वाटतं
ती झुलते पंखातून, मी पारवा होतो
ती गाते प्राणातून, मी मारवा होतो
ती जेव्हा सजते ना माझ्यासाठी,
तीळ बनून गाली उरावसं वाटतं
ती जेव्हा झुरतेना ना माझ्यासाठी,
काळजाला सुखात पुरावसं वाटतं
ती होते नदी, मी किनारा होतो
ती होते थंडी, मी शहारा होतो
ती जेव्हा येते ना अंधारातून,
विझून जावंसं वाटतं
ती जेव्हा येते ना पाऊस घेऊन,
भिजून जावंस वाटतं
ती पडते दवातून, मी कळी होतो
ती हसते गालातून, मी खळी होतो
ती जेव्हा वाटते ना मधासारखी,
भ्रमर व्हावसं वाटतं
ती जेव्हा असते ना माझ्याबरोबर,
अमर व्हावंसं वाटतं
ती होते ह्रदय, मी स्पंदन होतो
ती देते हात, मी बंधन होतो
ती जेव्हा मरते ना माझ्यासाठी,
तेव्हा जगावसं बाटतं
ती जेव्हा उरते ना प्रेम घेऊन,
तिला बघावसं वाटतं
शब्द व्हावंसं वाटतं
ती जेव्हा चालते ना जनातून
स्तब्ध व्हावंसं वाटतं
ती हलते पानातून, मी वारा होतो
ती फुलते नभातून, मी तारा होतो
ती जेव्हा रुसते ना माझ्यावर,
ओंजळीच्या उशीत घ्यावसं वाटतं
ती जेव्हा रडते ना अनावर,
आई बनून कुशीत घ्यावसं वाटतं
ती झुलते पंखातून, मी पारवा होतो
ती गाते प्राणातून, मी मारवा होतो
ती जेव्हा सजते ना माझ्यासाठी,
तीळ बनून गाली उरावसं वाटतं
ती जेव्हा झुरतेना ना माझ्यासाठी,
काळजाला सुखात पुरावसं वाटतं
ती होते नदी, मी किनारा होतो
ती होते थंडी, मी शहारा होतो
ती जेव्हा येते ना अंधारातून,
विझून जावंसं वाटतं
ती जेव्हा येते ना पाऊस घेऊन,
भिजून जावंस वाटतं
ती पडते दवातून, मी कळी होतो
ती हसते गालातून, मी खळी होतो
ती जेव्हा वाटते ना मधासारखी,
भ्रमर व्हावसं वाटतं
ती जेव्हा असते ना माझ्याबरोबर,
अमर व्हावंसं वाटतं
ती होते ह्रदय, मी स्पंदन होतो
ती देते हात, मी बंधन होतो
ती जेव्हा मरते ना माझ्यासाठी,
तेव्हा जगावसं बाटतं
ती जेव्हा उरते ना प्रेम घेऊन,
तिला बघावसं वाटतं
Friday, May 11
नाही मी म्हणणार नाही....
मागून बघ जीव ही नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी पुन्हा मी मिळणार नाही
तुझा झालो तेव्हाच मी माझ्यासाठी सपलो होतो
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी तुझ्या बरोबरच जगलो होतो
श्वासांच्या प्रत्येक स्पंदणात फक्त तुलाच तर जपले आहे
मागून घे श्वास ही नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी पुन्हा मी मिळणार नाही
तुझे माझे काही असते कधी कळलेच नाही
तुझ्या शिवाय जगायचे स्वप्न ही कधी पडलेच नाही
मागून घे स्वप्ने ही नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी पुन्हा मी मिळणार नाही
स्वर्ग सजवायचा तुज्यासाठी म्हणून सार करत होतो
जमिनीवर उभे राहून आकाशालही पकडत होतो
उघडुन बघ मूठ ही नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी पुन्हा मी मिळणार नाही
ईतकेच सांगतो तुला ही माझ्या शिवाय जमणार नाही
आणि तुझे ते तरफडणे मी सहन करणार नाही

Tuesday, May 8
आपल्या मैत्रीमध्ये.....
एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
आपल्या मैत्रीमध्ये हीच एक गोष्ट फ़क्त खास आहे
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे

Sunday, May 6
समाजाची भिंत !!!! ....
तुला दुखावण्याचा माझा कधीही हेतू नव्हता,
जिवापाड जपण्याचाच माझा नेहमी प्रयत्न होता.
नशीबवान आहे मी, तू भरभरून प्रेम दिलेस मला,
तुझ्याकडून फ़ुले घेऊन मात्र, मी कायम काटेच दिले तुला.
तुझे ह्रदय तोडताना माझ्याही काळजावरही वार झाले,
पण जन्मदात्यांना दुखावने मला शक्य नाही झाले.
तुझे ह्रदय माझ्यासाठी क्षणन् क्षण असेल रडत,
आजही तुझी नजर सर्वत्र मलाच असेल शोधत.
माझ्या आठवणींत तुझ्या रात्री घालवू नकोस व्यर्थ,
परस्परांची आस धरण्यात आता उरला नाही अर्थ.
माझ्यासाठी तू जराही बाळगू नकोस ग खंत,
आपल्या प्रेमास बंधनकारक ठरली ही समाजाची भिंत !!!!

आयुष्यात प्रेम करायचय मला....
आयुष्यात प्रेम करायचय मला..
दुर कुठेतरी समुद्र किनारी हातात हात घालून बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना भविष्याचे हितगुज करायचय मला...
माझ्या मांडीवर डोके ठेऊन तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहऱ्याकडे पहाताना स्वतःशी स्मित करायचय मला...
तिच्या सोबत थोडं दुष्टपणे वागुन तिला रागाने लालबुंद करायचय मला,
तिची आसवे पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय मला...
आयुष्यतील माझं शिखर तिच्या सोबतीने चढायचय मला,
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीचा आनंद तिच्या डोळ्यांतून व्यक्त झालेला अनुभवायचाय मला..
ती माझ्यापासून दूर जात आसताना ती नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना डोळ्यांवाटे मुक्त करायचय मला, तिच्या सोबत माझे आयुष्य झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला...

Thursday, May 3
आपला चन्द्र निवडलेला असतो .......
नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो,
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...
तिच्या चेहरयाला चन्द्र म्हणण्याची त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही त्याने जीद्द सोडलेली नसते
तिच्या सॊन्दर्य़ाचे गुणगाण करण्याचा छंदच जणू त्याला जडलेला असतो
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...
पान-टपरी वाल्याकडे त्याची अगदी महिनो-महीने उधारी असते
तरी तिच्यासाठी चन्द्र आणण्याची त्याची एक पायावर तयारी असते
तिच्यासाठी काहिही करण्याचा निर्धार, त्याच्या मनात खोलवर दडलेला
नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो........
तिच्यासाठी गुलाब तोडताना तो कधी काट्याची तमा बाळगत नाही
आणि ती सोबत असेपर्यन्त त्याला सुख कधीच उमगत नाही,
तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुखः सागरात बुडालेला असतो
कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो........

Wednesday, May 2
सुकलेली फुलं
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही
तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन
चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं
कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकातमाझ्या
साठीची सुकलेली फुलं असतील

जेव्हा तु
जेव्हा तु हसतेस
अजुन सुदंर दिसतेस
मग मैत्रीणींच्या घोळक्यातसुध्दा
अजुन उठून दिसतेस
जेव्हा तु बघतेस
माझ्या नजरेलाच रोखुन ठेवतेस
त्या नजरेच्या पलीकडचंही
काहितरी सांगुन जातेस
जेव्हा तु बोलतेस
सा-या जगाचा विसर पाडतेस
मग माझ्या शब्दांनाही
तुझ्यासमोर अबोल करतेस
जेव्हा तु निघून जातेस
माझी सोबत सोडतेस
आयुष्याच्या वाटेवरचा
माझा प्रवासच थांबवतेस......................

ती..........
ती माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझीवाट बघत थांबायची....
दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....
तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....
एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही
रोज गोड हसायची,
कधी कधी माझीवाट बघत थांबायची....
दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....
तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....
एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही
मैत्री..........
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...
कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........
माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या वळणांवर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......
आठवत .....
आठवत त्या मुसळधार पावसामधे
तु चिंब भिजून गेली होतीस
अन ओलेल्या मनाने मला बिलगून
शांतपणे निजून गेली होतीस
खरच सांगतो त्या पाण्यामधे
माझ काळीज बुडत आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे
वाटत कधी कधी मनातली बात
तुला कशी सांगून टाकावी
अन ह्र्दयाची गाठ
जमलच तर बांधून टाकावी
तूच समजाव माझ्या मनाला
कारण तुला कळतं आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे
तु चिंब भिजून गेली होतीस
अन ओलेल्या मनाने मला बिलगून
शांतपणे निजून गेली होतीस
खरच सांगतो त्या पाण्यामधे
माझ काळीज बुडत आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे
वाटत कधी कधी मनातली बात
तुला कशी सांगून टाकावी
अन ह्र्दयाची गाठ
जमलच तर बांधून टाकावी
तूच समजाव माझ्या मनाला
कारण तुला कळतं आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे
तु नसताना ................
तु असताना तुझाशी,
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्शा तुझ्या,
नसण्यातच मी जास्त जगतो
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्शा तुझ्या,
नसण्यातच मी जास्त जगतो
जीतकी ओढ मला तुझी
जीतकी ओढ मला तुझी
तितकीच तुलाही आहे का ?
जीतके प्रेम माझे तुझ्यावर
तीतकेच तुझही आहे का ?
मी समोर नसतानाही
मला कधी पाहतेस का ?
उत्तर रात्रि शान्तसमयी
स्वप्नात मला पाहतेस का ?
ऎक क्षण मी दिसाव,
म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण सम्पुच नये,
असा विचार कधी करतेस का?
एकान्ती आपल्या गुजगोष्टी,
आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने,
मोहरुन कधी जातेस का ?
माझा वेडेपना आठवुन,
स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे,
असे कधी ठरवतेस का ?
काळही सगळा सम्पुन जायील,
विचारणे माझे सम्पनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे,
उत्तर एकाचे तरी देशील का ?
तितकीच तुलाही आहे का ?
जीतके प्रेम माझे तुझ्यावर
तीतकेच तुझही आहे का ?
मी समोर नसतानाही
मला कधी पाहतेस का ?
उत्तर रात्रि शान्तसमयी
स्वप्नात मला पाहतेस का ?
ऎक क्षण मी दिसाव,
म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण सम्पुच नये,
असा विचार कधी करतेस का?
एकान्ती आपल्या गुजगोष्टी,
आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने,
मोहरुन कधी जातेस का ?
माझा वेडेपना आठवुन,
स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे,
असे कधी ठरवतेस का ?
काळही सगळा सम्पुन जायील,
विचारणे माझे सम्पनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे,
उत्तर एकाचे तरी देशील का ?
Subscribe to:
Posts (Atom)