तुला दुखावण्याचा माझा कधीही हेतू नव्हता,
जिवापाड जपण्याचाच माझा नेहमी प्रयत्न होता.
नशीबवान आहे मी, तू भरभरून प्रेम दिलेस मला,
तुझ्याकडून फ़ुले घेऊन मात्र, मी कायम काटेच दिले तुला.
तुझे ह्रदय तोडताना माझ्याही काळजावरही वार झाले,
पण जन्मदात्यांना दुखावने मला शक्य नाही झाले.
तुझे ह्रदय माझ्यासाठी क्षणन् क्षण असेल रडत,
आजही तुझी नजर सर्वत्र मलाच असेल शोधत.
माझ्या आठवणींत तुझ्या रात्री घालवू नकोस व्यर्थ,
परस्परांची आस धरण्यात आता उरला नाही अर्थ.
माझ्यासाठी तू जराही बाळगू नकोस ग खंत,
आपल्या प्रेमास बंधनकारक ठरली ही समाजाची भिंत !!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment